तुडवण : ग्रामीण महाराष्ट्रातील सुशिक्षितांच्या जगण्याची काटेरी शोकात्म व्यथा
‘तुडवण’ शिकलेल्यांच्या प्रश्नाविषयी सजग करते. यामध्ये एक अख्खा गाव अनेक प्रश्नाच्या सोबतीनं ठळकपणे उभा राहतो. जो तुमचा माझा कोणाचाही असू शकेल. गाव, दुष्काळ, कोरडवाहू शेतकऱ्याची जगण्याची धडपड, शिक्षणव्यवस्थेतील फोलपणा, तरुणांचं अंध:कारमय भविष्य, नातीगोती, रिवाज, पैशासाठी पायदळी चाललेली माणुसकी, याचे विस्मयकारक जग या कादंबरीतून लेखकाने उभे केले आहे. हे जग आजच्या वर्तमानाचेच भयावह प्रतिबिंब आहे.......